Full Text Transcript
Text below was recognized via OCR from scanned pages and may contain minor errors.
Civil Services (Main)
Examination, 2026 KVMS-D-MRTH
मराठी
प्रश्न-पत्रजा
( साहित्य )
वेळ : লীন तास कमाल अंक : 250
प्रश्नपत्रिकेबाबतच्या ठळक सूचना
उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी कृपया पुढील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात
आठ प्रश्नांची विभागणी दोन भागांमध्ये केलेली आहे.
उमेदवाराला एकूण पाच प्रश्न सोडवावयाचे आहेत.
प्रश्न क्रमांक 1 आणि 5 हे अनिवार्य आहेत. आणि उर्वरित प्रश्नांपैकी तीन प्रश्न सोडवताना प्रत्येक विभागातील किमान एक तरी प्रश्न
सोडवणे आवश्यक आहे.
प्रश्नासमोर गुण दिलेले आहेत.
मराठीतच उत्तरे लिहावीत
ज्या प्रश्नांमध्ये शब्दमर्यादा उल्लेखलेली असेल, त्याचे कटाक्षाने पालन करावे
प्रश्नांच्या क्रमानुसारच प्रश्न सोडवावेत. प्रश्न सोडवत असताना उत्तरातील काही भाग लिहिण्याचा राहिल्यास किंवा उत्तरपत्रिकेतील एखादे
पान कोरे सोडल्यास तेथे काट मारावी.
MARATHI
PAPER-II
( LITERATURE )
Time Allowed : Three Hours Maximum Marks : 250
QUESTION PAPER SPECIFIC INSTRUCTIONS
Please read each of the following instructions carefully
before attempting questions
There are EIGHT questions divided in two Sections.
Candidate has to attempt FIVE questions in all.
Question Nos. 1 and 5 are compulsory and out of the remaining, THREE are to be attempted
choosing at least ONE question from each Section.
The number of marks carried by a question/part is indicated against it.
Answers must be written in MARATHI.
Word limit in questions, wherever specified, should be adhered to.
Attempts of questions shall be counted in sequential order. Unless struck off, attempt of a
question shall be counted even if attempted partly. Any page or portion of the page left
blank in the Question-cum-Answer Booklet must be clearly struck off.
KVMS-D-MRTH/32 1 [1.0
SECTION—A
1. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 750 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा : 10x5=50
(2) माहादाइ-वोवीया-गायेन-श्रवर्णि रूपैची सीध (ತ) वाणि म्हणणें : ॥ : एकु दीसु महादाइसीं काइसेया प्रकरणावरूनि
वोविया गाइलीया : तें ୩୩୩୩ : | : महादाइसीं म्हणितलें : नागदेवाचेया खांदावरि करु : राजा चक्रधरू : 8
करी : ॥१॥ सोनेसळा सेला : नेसला मालगर्ठी : ன आला भेटी : प्रभूचीये : ॥२॥
(b) तशांत पर्जन्याची अनावृष्टि झाल्यावरून पडलेल्या दुष्काळांत चारापाण्यावांचून लक्षावधि बैलांचा सरसकटीनें खप
होऊन त्यांचें ਗਟੇਲੇ झालें.
(0 (स्वतःच्या प्रयत्नाने माझे लग्न जुळविण्याची खटपट फारशी करता आली नाही. तशी खटपट करावयाची म्हणजे
चोरून तरुणांच्या भेटी घेणे इत्यादी क्रिया कराव्या लागल्या असत्या, पण त्या शक्य झाल्या नाहीत. आमचे बाबा
जरी सुधारक म्हणवीत होते तरी स्त्री -पुरुषांचा मोकळा व्यवहार असावा याच्या તે विरुद्धच होते."
घेतासत વ माणसं व बाया جو निंदणं-खुरपण्याच्या मोसमात लई करून गडी વ काही बाया मिळून खुरपण्याचे رم
बरोबरीनेच निंदीत असूनही माणसाला बाईच्या डबल दाणे देतासत ন बायाला माणसाच्या निम्मे दाणे देतासत.
( पुरुष बहुधा ಸತ್ರ असतातच, पण आता इतक्या बाया पाहून मला तर वाटायला लागलंय की त्यांच्याशी संसार
करायला ಸತ್ರ पुरुषच વેત!”
2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(ಯ स्मृतिस्थळ या ग्रंथाच्या आधारे महानुभाव संप्रदायाच्या तत्त्वज्ञान आणि आचारधर्माची कोणती वैशिष्ट्ये
अधोरेखित होतात, ते स्पष्ट करा. 15
മു सार्वजनिक सत्यधर्म' या ग्रंथातून महात्मा फुले यांचे नवसमाज निर्मितीचे विचारसूत्र कसे प्रकट झाले आहे, તે
सोदाहरण लिहा. 15
/4 (समाजप्रबोधनाचे कार्य यशस्वीपणे पार पाडणाऱ्या “ब्राह्मणकन्या' या कादंबरीचा आकृतिबंध मनावर पकड घेणारा
আই." या विधानाची विस्तृत चर्चा करा. 20
3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(a) साष्टांग नमस्कार' या नाटकाच्या भाषिक आणि अभाषिक घटकांची सोदाहरण चर्चा करा. 15
മു 'शिव्ठान' कथासंग्रहात कृषिसंस्कृतीवर आधारित मानवी जीवनाचे प्रतिबिंब कसे उमटले आहे, ते स्पष्ट करा. 15
(જ बाबुराव बागूल' यांच्या जेव्हा मी जात चोरली होती!" या कथासंग्रहातून वेदना, विद्रोह आणि नकार यांचे दर्शन
कसे घडते, ते स्पष्ट करा. 20
KVMS-D-MRTH/32 2
4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(a) ୩୯୩୮ मुक्तिबोध यांच्या “जन हे वोळतु ணி या कादंबरीतून 'मानुषता' या संकल्पनेचे प्रगटीकरण
प्रत्ययकारीरित्या झाले আই”, कसे તે सोदाहरण लिहा. 15
(૭) “श्र. ई. सोनकांबळे यांच्या “आठवणींचे पक्षी' या आत्मकथनाचे लेखन म्हणजे बाल व युवा अवस्थेतील
अनुभवजन्य जाणिवांचे चित्रण সাই”, याची चर्चा करा. 15
(੦) “गौरी देशपांडे यांच्या एकेक पान गव्ठावया' मध्ये स्त्री-पुरुष संघर्षाचे प्रभावी दर्शन ged.” या विधानाचा
परामर्श घ्या. 20
SECTION—B
5. पुढील पाच उताऱ्यांचे प्रत्येकी 150 शब्दांत रसास्वादपूर्वक विवेचन करा : 10x5=50
(૦) नदीचिया माशा घातलें माजवण। तैसें जनवन تچ
दाही दिशा धुंद उदयास्तावीण। तैसेंची गगन कालवलें ॥
जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी। पुढें ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा | पादपं ठेवा निरंतर ॥
(૭) म्हातारी Seat न येच तिजला মানা मदीया तसी |
माता काय ਕਗੇ; नवप्रसव লি’ सातां दिसांची असी ||
त्राता ત્યા उभयांस मी मज विधी घातास 3۱
हातामाजि नृपाचिया गवसलों आतां करावें कसें॥
ര आम्हि मुशाफर लोक प्रीत करू ୩୪୩ साजणी |
दीपकळीचा रंग पाहुनी पतंग झुरतो मनीं ॥ ध्रु. ||
(0 देहाच्या वाती वळून, प्रज्वलित करून
तुझ्या निरांजनात पालवून
एका नव्या क्रांतीकडे, नव्या प्रकाशाकडे
आमचे घोडे उधळले; तर हे देशा--
कृतघ्नतेचे आरोप आमच्यावर करू नकोस
तुझ्या आकाशातील आम्हीही तारे आहोत
हे विसरू नकोस.
ഭു तुझा घोडा तूं मोकळा सोडलास
शिशिराच्या निर्विघ्न कुरणांत...
तो मध्येंच दिपून पाहतो, एका नसलेल्या ध्रुवाच्या
festa झिजणान्या तुझ्या देहास...
तुला वाटतात तितके सोपे नसतात तुझे अश्रु;
पाण्याच्या सलीलसंभ्रमात हलतात जखमी
ख्रिस्ताच्या घंटा रात्रंदिवस...
KVMS-D-MRTH/32 3 [೫.7:0.
6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(2) बुद्धी आणि भावना यांचा सुरेख संगम नामदेवांच्या अभंगवाणीत अनुभवास Ad’, या विधानाचे विश्लेषण करा. 15
(b) “SIR रस आणि वीररस ही शाहिरी कवितेची बलस्थाने होत", कसे ते પળ च्या आधारे स्पष्ट करा. 15
(९) आख्यानकाव्या'ची गुणवैशिष्ट्ये सांगून "दमयंती -स्वयंवरा'त ती कशी दिसून येतात, ते विशद करा. 20
7. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(ಯ बालकवींच्या काव्याच्या भाषाशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. 15
(૭) कवी कुसुमाग्रजांना "प्रकाश पूजक જવી' असे का म्हटले जाते, ते विशाखा' कवितासंग्रहाच्या आधारे लिहा. 15
୮୯ महानगरातील समाजवास्तव हा नारायण सुर्वे यांच्या कवितेचा गाभा आहे'', हे विधान 'जाहिरनामा'तील
कवितांच्या आधारे उलगडून दाखवा. 20
8. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(6) मुक्तछंद દે छंदोबद्धच काव्य असते', हे विधान कवी ग्रेस यांच्या 'संध्याकाळच्या कविता' या काव्यसंग्रहातून कसे
प्रत्ययास येते ते लिहा. 15
(8) या सत्तेत जीव रमत नाही' या संग्रहातील कविता नामदेव ढसाळ यांची समाजनिष्ठा आणि कवीची अंतर्मुखता
याविषयीचे चिंतन व्यक्त करते, कसे ते सांगा. 15
'मृदगंध' मधील सामाजिक आणि प्रेमानुभव व्यक्त करणाऱ्या कवितांचा परिचय करून द्या. 20 مم
kkk
KVMS-D-MRTH/32 4 SB27—30