← Back to UPSC Previous Year Papers

Previous Year Question Paper

QP-CSM-26-010926-Compulsory-MARATHI

Pages7
FormatPDF
SourceOCR transcription

Please verify you're human to unlock the download & viewer links.

Full Text Transcript

Text below was recognized via OCR from scanned pages and may contain minor errors.

Civil Services (Main) Examination, 2026 KVMS-C-MRTH मराठी / MARATHI ( अनिवार्य ) / (Compulsory ) वेळ : तीन तास कमाल अंक : 300 Time Allowed : Three Hours Maximum Marks : 300 प्रश्नपत्रिकेशी संबंधित सूचना प्रश्न सोडविण्यापूर्वी पुढीलपैकी प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचा : सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्‍नाचे गुण त्या त्या प्रश्नासमोर दिलेले आहेत. प्रश्‍नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्‍नांची उत्तरे मराठीत (देवनागरी लिपीमध्ये) लिहावयाची आहेत. जेथे जेथे शब्दसंख्येची मर्यादा प्रश्‍नामध्ये सांगितलेली असेल, तेथे तिचे पालन केलेच पाहिजे. सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा खूप जास्त अथवा खूप कमी शब्दांत उत्तर लिहिलेले असल्यास गुण कमी केले जाऊ शकतात. प्रश्न-उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी. Question Paper Specific Instructions Please read each of the following instructions carefully before attempting questions : All questions are to be attempted. The number of marks carried by a question is indicated against it. Answers must be written in MARATHI (Devanagari script) unless otherwise directed in the question. Word limit in questions, wherever specified, should be adhered to and if answered in much longer or shorter than the prescribed length, marks may be deducted. Any page or portion of the page left blank in the Question-cum-Answer Booklet must be clearly struck off. KVMS-C-MRTH 1 Ql. Q2. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर 600 शब्दांत निबंध लिहा. (8) प्रबुद्ध भारत ची संकल्पना आणि आपले भवितव्य (७) डिजिटल युगात नागरिकांची कर्तव्ये (८) भारतात अंतराळ (अंतरिक्ष) संशोधन आणि मंगळयान (ત) आरोग्यसेवेच्या सोयी आणि गुणवत्ता पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उतान्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्यव संक्षिप्त भाषेत लिहा. 12x85: दुःखाच्या निर्मितीला भीती जितकी कारणीभूत असते, तितकेच महत्त्वाचे स्थान आनंदात उत्साहाला असते. ज्या कामात कष्ट आणि हानी सहन करण्याची अपेक्षा असते, त्या कामात सर्वांसाठी उत्कंठावर्धक आनंदही अंतर्भूत असतो. कष्ट किंवा हानी च्या भेदानुसार उत्साहा मध्ये पण भेद होतो. साहित्य मीमांसकांनी याचदृष्टीन युद्धवीर, दानवीर, दयावीर, इत्यादी भेद केले आहेत. त्यात युद्धवीरता सर्वाधिक प्राचीन व महत्त्वाची मानली जाले, कारण त्यात आघाताची, दु:खाची इतकेच नव्हे तर मृत्युची सुद्धा पर्वा केली जात ਗਈ. वीरतेत धाडस आणि प्रयत्न यांचा परमोत्कर्ष झालेला असल्याने प्राचीन काळापासून वीरतेला प्राधान्य दिले जाते. पण केवळ कष्ट आणि दुःख सहन करण्याची क्षमता असून चालत नाही. तर अत्यंत आनंदाने, उत्साहाने केलेला प्रयत्न प्रयत्नाचा योग पाहिजे. बेशुद्ध झाल्याशिवाय भारी फोडाला चीरा घेण्याला तैयार होणे साहस म्हटले जाईल, उत्साह नव्हे. त्याचप्रमाणे हातापायाची हालचाल न करता असह्य आघात सहन करीत जागेवरून न हालणे याला धाडस म्हणता येईल, પળ आनंदाने, उत्साहाने सामोरे जाण्याला धैर्य आणि धाडस म्हणता येईल. सारांश केवळ निचेष्ट राहूण कष्ट सहन करण्यात नव्हे; तर आनंदाने उत्कंठापूर्वक केलेल्या कामात उत्साहाचे दर्शन घडते. धैर्य आणि साहस या दोन्हींचा अंतर्भाव उत्साहात होतो. दानवीर च्या अर्थ त्यागाचे साहस अर्थात त्याच्या मुळे होणाऱ्या कष्ट किंवा त्रासाला सहन करण्याची क्षमता त्यात अंतर्भूत असते. दानवीरता तेव्हांच म्हटली जाईल, जेव्हा दानवीराला दाना मुळे आपल्या जीवन निर्वाहात कुठल्या प्रकारा चे कष्ट किंवा त्रास दिसतील. याच कष्ट आणि त्रासा ची मात्रा किंवा शक्यता जेवढी जास्त असेल दानवीरता तितकीच ऊंच समजली जाईल. पण या अर्थ त्यागा च्या साहस सोबत, जो पर्यंत पूर्ण तत्परता आणि आनदां ची चिन्ह दिसणार नाही, तो पर्यंत उत्साह प्रत्ययाला नाही येणार. KVMS-C-MRTH 2 100 =60 Q3. जीवनात युद्धाव्यतिरिक्त शारीरिक कष्ट, प्राणहानी सारखे बिकट प्रसंग सहन करावे लागतात. संशोधनात निसरडया, aie, अगम्य पर्वतावर चढाई करावी लागते. बर्फाळ धुवप्रदेशात, वैराण वाळवंटात भ्रमंती करावी लागते. तसेच क्रूर, अमानवी जातींच्या सहवासात, घनघोर निबिडे अरण्यात वावरतांना धाडस आणि शौर्य दाखवावे लागते, यात आनंद मानणाऱ्या लोकांत उत्साहाची प्रचिती येते. (a) साहसात उत्साहाला किती महत्त्व असते, ते स्पष्ट करा. 0) धैर्य म्हणजे काय? (€) उत्साहाचे खरे दर्शन कशाप्रकारे होते ? (4) आनंददायक तत्परता आणि उत्साह यांमधील अंतर्सबंध उलगडून सांगा. (੬) दानशूराला दान दिल्याने कोणत्या यातना सहन कराव्या लागतात ? पुढील उताच्याचा अंदाजे एक-तृतीयांश शब्दांत सारांश लिहा. उताय्याला शीर्षक देऊ नये. सारांश मराठीत लिहा. उत्तम श्रोता असणे हे समृद्ध जीवनशैलीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. तरी पण आपल्यापैकी फार कमी लोक उत्तम श्रोते असतात. याचा अर्थ आपण वाईट असतो असे नाही, आपल्याला कुणी तसे शिकवलेले नसते. यासंदर्भातील खरे कारण असे आहे की, तसे फार कमी लोकांनी आपल्याला लक्षपूर्वक ऐकलेले आहे. परिणामत: आपण सामाजिक जीवनात ऐकण्यापेक्षा बोलण्यातच अधिक गुरफटलेले असतो. इतरांना भेटण्याची ओढ वाढत असते, पण त्यांचे ऐकण्यासाठी आपणाकडे वेळ नसतो. त्यामुळे मैत्रीचे रूपांतर हळूहळू स्वार्थात होत जाते. एखाद्या उत्तम श्रोत्याचा सहवास अत्यंत आनंददायक असतो. पण त्याच्याशी बोलतांना बहुदा आपण पुरेशा मोकळेपणाने व्यक्त होत नाही; त्यामुळे आपल्या बोलण्यात अस्पष्टता असते. त्यामुळे आपले बोलणे महत्त्वाचे असूनही दुर्लक्षित केले जाते. आपल्यावर कामाचा ताण असतो, किंवा आपल्या क्षेत्रात लौकिक प्राप्त करण्याची आपली आकांक्षा असते. किंवा आपणास नेमके काय हवे आहे. याविषयी आपण अनभिज्ञ असतो. आपली निकटची व्यक्ती संकटात असेल, कोणत्या तरी कारणाने आपण चिंताग्रस्त असू, आपले जीवन नैराश्याने व्यापलेले असेल अगर एखाद्यावेळी आपण अतिउत्साही असतो; सर्वत्र उर्जा भरलेली असते. पण त्या उत्साहामागील कारण आपणास माहित नसते. KVMS-C-MRTH 3 12 12 12 12 12 60 वस्तुत: हे सारे सुस्पष्ट व्हायला हवे. एका उत्तम श्रोत्याला हे ज्ञात असते की; सुसंवादामुळे संभ्रमित, अतिउत्तेजित मनाला विकेंद्रित आणि शांत मनोवस्थेत नेता येते. सुसंवादाने आपले काय हरवले आहे याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू शकतो पण हे एऱहवी घडत नाही, त्यासाठी बोलण्यात सुस्पष्टता असणे आवश्यक असते. मात्र त्याबद्दल आपण पुरेसे सजग असत नाही. उत्तम श्रोत्यांची नेहमीच कमतरता असते, त्यामुळे लोक समोरच्याला समजून न घेता स्वतःच्याच म्हणण्यावर अडून राहतात. चिंता, अतिउत्साह किंवा अपेक्षांचे ओझे सोबत घेऊन वावरतात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे गांभीर्यपूर्वक समजून घेत नाहीत. उत्तम श्रोता व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून सल्ला देतो आणि परिस्थितीत बदल घडवण्याचा प्रयत्न करीत असतो. तो दुसऱ्यांच्या भावना समजून घेतो, त्याला प्रोत्साहीत करतो. सहानुभाव व्यक्त करून त्याचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करतो. समोरच्या व्यक्तीच्या संभाषणाविषयी त्याने दाखविलेली आस्था व जिज्ञासा पाहून व्यक्ती विचारांच्या, भावनांच्या ‏جس‎ जाण्यास प्रवृत्त होते. तो सांगू लागतो, “मला त्याबद्दल आणखी काही सांगा...” “जेव्हा तू असे म्हणालास ते ऐकून मी मंत्रमुग्ध झालो”, किंवा “तुला याक्षणी काय वाटले ?”, उत्तम श्रोत्याला हे माहीत असते की, अस्वस्थ स्थितीतील व्यक्तीच्या बोलण्यात संदिग्धता असणे ही एक सार्वत्रिक आढळणारी गोष्ट आहे; आणि त्या अस्वस्थेचे निराकरण करणे चांगल्या सच्च्या मित्राचे दायित्व आहे. आपण नेहमी एखाद्या घटनेच्या अवतीभोवती घोटाळत असतो, तिच्या मूळापर्यंत जाण्याचा सहसा प्रयत्न करीत नाही. अशा परिस्थितीत उत्तम श्रोत्याच्या संभाषणाने व्यक्तीला त्या गोष्टीच्या मूळापर्यंत जाण्याची प्रेरणा मिळते. आपणाला अशा व्यक्तीची गरज असते की, जो केवळ सल्ला देण्याऐवजी “पुढे चला अशा जादुई शब्दाची योजना करून प्रोत्साहीत करील. आपण नेहमी बहीण-भावाच्या नात्यासंबंधी बोलत असतो. त्याविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सुक असतो. त्यांचे बालवयातील संबंध कसे असतील? बदलत्याकाळानुसार त्यात कसकसे बदल होत गेले असतील ? यासंदर्भातील आपल्या चिंता आणि उत्सुकतेचे मूळ कशात आहे ? ते विचारतात, “त्या गोष्टीची तुम्हाला एवढी काळजी का वाटत असते?” किंवा “ती गोष्ट तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची का आहे?” त्यांना आमच्या भूतकाळच्या गोष्टी आठवत असाव्यात. त्यामुळे ते आमच्या भूतकाळातल्या गोष्टींचे दाखले देत असावेत. आणि असेही वाटते की, ते आमच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. संवादात संदिग्धता असल्याने सहजपणे आघात होण्याची शक्यता असते. आपण सहज म्हणतो, अमूक वस्तू सुंदर आहे. सुखद आणि त्रासदायक आहे. पण आपण असा विचार करीत नाही, आपणाला असे का जाणवले ? उत्तम श्रोता अशा सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मनाच्या तळाशी दडलेल्या भावनांची उकल करण्याचा प्रयत्न करीत असतो. (510 शब्द) KVMS-C-MRTH 4 ৫4. Q5. पुढील उतान्याचे इंग्रजीत भाषांतर करा. जहाज चालवण्याच्या कौशल्याबद्दल भारतीय नाविकांचा लौकिक प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. 5000 वर्षा त्यांनी समुद्रात नौकानयन करण्यास सुरूवात केली होती. त्या काळात समुद्रप्रवासाची अत्यल्प यंत्रे उपलब्ध होती. आजच्यासारखी अत्याधुनिक साधनसामुग्री त्या काळात नव्हती. पण प्राचीन नाविकांची ज्ञानेंद्रिये इतकी तेजपुंज होती की, त्यांना हवामानाचा अचूक अंदाज बांधता येत होता. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीगतीवरून ते हवामानाचा अंदाज करीत. समुद्राच्या पाण्याच्या रंगावरून ते पाण्याच्या खोलीचा अंदाज बांधत. समुद्री जीवजंतुच्या अस्तित्वावरून ते जमीनीचे अंतर शोधत असे. इतकेच नाही तर काही वेळा तर ते एखाद्या देशाचा मार्ग सहजपणे काढत. त्या काळात सामुद्रिक प्रशिक्षिण देणाऱ्या संस्था नव्हत्या, अनुभव-निरीक्षण आणि चूकांमधून शिकणे हयाच त्यांच्या पाठशाळा होत्या. प्रवासात कधी-कधी दुर्घटना घडत असतील, पण त्यांचे शौर्य आणि आत्मविश्वास त्यांना समुद्रप्रवासासाठी प्रेरणा देत होता. याच आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी पश्चिमेची फारस खाडी, अफ्रिकेचा पूर्वकिनारी प्रदेश, तसेच पूर्व इंडोनेशिया, कंबोडिया, अन्नाम, बोर्नियो आणि सेलीबीज सारख्या अज्ञात द्वीपांपर्य॑त जाण्यात ते यशस्वी झाले होते. सामुद्रिक प्रशिक्षण देण्याची आधुनिक प्रणालीचा आरंभ 1920 च्या पहिल्या दशकात झाला. स्वातंत्र्यानंतर भारतात परिवर्तनाची सुखद लहर वाहू लागली. भारताच्या गौरवशाली नौकानयन सूर्याचा अंत काही वर्षांपूर्वी झाला होता, त्याचा पुन्हा एकदा नवा उदय होऊन तो चकाकू लागला आहे. भारतीय जहाजविश्व आज पुन्हा एकदा योग्य दिशेने वाटचाल करण्यात अग्रेसर झाले आहे. पुढील उतान्याचे मराठीत भाषांतर करा. Orientation for entrepreneurship has to start right from the schools. In schools, teachers need to highlight the role of entrepreneurship in national development. During college, students must be exposed to business development opportunities and must be trained towards the creation of new enterprises. Parents should encourage their children to take up new ventures after their education. We should cultivate a mindset that ‘Idea is wealth’. KVMS-C-MRTH 5 20 20 The government must create a facilitating environment for the provision of venture capital for innovative ideas without collateral security. Universities and engineering and management institutions should work with banks and other funding agencies towards simplifying procedures for setting up businesses and working with entrepreneurs till the project becomes self-sustaining and viable. Procedures in government should facilitate the spotting and recognition of new Indian talent in entrepreneurship by creating a level playing field for healthy competition. Citizens who can afford it should turn themselves into angel investors or start venture capital organizations to fund such new ventures. Big and small industries need to have an open mind in order to encourage and partner with young entrepreneurs. ૦6. (a) पुढील वाकुप्रचारांचा/म्हणींचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2x5=10 0) हाडाची काडे करणे 2 (1) नाकाला मिरच्या झोंबणे 2 (1) तोंडसुख घेणे 2 (iv) दात कोरून पोट भरणे 2 (1) बारशाला गेला आणि तेराव्याला आला 2 (७) खाली दिलेल्या कल्पनांचा 10 वाक्यात विस्तार करा. 5x2=10 0) श्रमहाच धर्म 5 (7) आणि किल्ला बोलू लागला 5 KVMS-C-MRTH 6 (૦ खाली दिलेल्या विषयावर 20 वाक्याचा संवाद लिहा. 10 मासळीबाजार (৭) पुढे दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1x5=5 ദ उत्कंठा 1 00) खुशमस्करी 1 (1) त्राता 7 (iv) दवंडी 7 (४) परिभ्रमण 1 (6) पुढे दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1x5=5 ଓ) चित्रदर्शी 1 ൮ ಟು 1 (1) घुमा 1 (૪) शाश्‍वत 1 യ वरदहस्त 1 KVMS-C-MRTH 7