Full Text Transcript
Text below was recognized via OCR from scanned pages and may contain minor errors. Mathematical formulas and symbols may be approximate - please refer to the PDF for the exact equations.
Civil Services (Main)
Examination 2025 SLPM-C-MRTH
मराठी / MARATHI ,
( अनिवार्य ) / (Compulsory )
वेळ : तीन तास कमाल अंक : 300
Time Allowed : Three Hours Maximum Marks : 300
प्रश्नपत्रिकेशी संबंधित सूचना
प्रश्न सोडविण्यापूर्वी पुढीलपैकी प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचा :
सर्व प्रश्न सोडवायचे आहेत.
प्रश्नाचे गुण त्या त्या प्रश्नासमोर दिलेले आहेत.
प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नांची उत्तरे मराठीत (देवनागरी लिपीमध्ये) लिहावयाची आहेत.
जेथे जेथे शब्दसंख्येची मर्यादा प्रश्नामध्ये सांगितलेली असेल, तेथे तिचे पालन केलेच पाहिजे. सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा खूप जास्त
अथवा खूप कमी शब्दांत उत्तर लिहिलेले असल्यास गुण कमी केले जाऊ शकतात.
प्रश्न-उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी.
Question Paper Specific Instructions
Please read each of the following instructions carefully before attempting questions:
All questions are to be attempted.
The number of marks carried by a question is indicated against it.
Answers must be written in MARATHI (Devanagari script) unless otherwise directed in the
question.
Word limit in questions, wherever specified, should be adhered to and if answered in much longer
or shorter than the prescribed length, marks may be deducted.
Any page or portion of the page left blank in the Question-cum-Answer Booklet must be clearly
struck off.
SLPM-C-MRTH |
Ql.
Q2.
पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर 600 शब्दांत निबंध लिहा.
(8) भारतीय କ୍ୟା प्रासंगिकता
(8) विश्वयुद्धाचे वाढते संकट
(0 डिजीटल आर्थिक देवाण-घेवाणीचे फायदे
(त) भारतीय महिलांचा खेळातील वाढता सहभाग
पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उतान्याच्या शेवटी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सुस्पष्ट, योग्य
100
व संक्षिप्त भाषेत लिहा. 12x5=60
जैवविविधता ही विश्वातील जीवित प्रजातींची अशी विविधता आहे, ज्यात त्यांची अनुवांशिक
विविधता आणि त्यांनी तयार केलेल्या परिस्थितिकी समूदायांचा समावेश होतो. जीवनाची ही विविधता
आज गंभीर संकटांना तोंड देत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पुढील पाव शतकाच्या दरम्यान, उष्णकटिबंधीय
जंगलहानी आणि उलथापालथीचा वर्तमान वेग पाहता सर्व उष्णकटिबंधीय वन्य प्रजातींपैकी अंदाजे ५ ते
१० टक्के प्रजाती दर दशकात नष्टप्राय होतील.
विलुप्त होण्याचे हे संकट केवळ उष्णकटिबंधीय जंगलांपुरतेच मर्यादित नाही. नद्या बंदिस्त
` केल्यामुळे आणि परपप्रजातींच्या परिचयामुळे गोड्या पाण्यांतील अधिवासांवर नाटकीय परिणाम होत
आहेत. महासागरीय द्वीप, जिथे गेल्या कित्येक हजारो वर्षांतील बहुतांश विलोपनाच्या घटना घडल्या आहेत,
तरीही, पृथ्वीतलावरील सर्वांत धोकादायक परिस्थितिकी परिसंस्थांपैकी एक आहेत.
प्रजाती व अनुवांशिक विविधतेची क्षती आणि आधिवासांचा व परिस्थितिकी परिसंस्थांचा ऱ्हास
म्हणजे ह्या पिढीसाठी, तसेच भविष्यातील सर्वच पिढ्यांसाठी, मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. आज
नष्ट होत चाललेल्या प्रजातींचे अन्न, वैद्यकीय व औद्योगिक उपयोग अज्ञात आहेत. मानवी लोकसंख्येला
पेलण्याची क्षमता परिस्थितिकी परिसंस्था गमावत आहेत आणि जमीनीची धूप, जलाशयांची क्षारता,
स्थानिक हवामानातील बदल, वाळवंटीकरण आणि उत्पादकतेतील घट यामुळेही त्यांच्या ऱ्हासाची किंमत
चुकवावी लागत आहे.
SLPM-C-MRTH 2
Q3.
जैविक संसाधनांच्या मूल्यनिर्धारणासाठी मुख्यत्वे तीन दृष्टिकोन उपयोगात आणले गेले आहेत.
उपभोग्य-वापर मूल्यांकनामध्ये जळाऊ लाकूड, चारा, शिकारीत मांस यांसारख्या संसाधनांचे मूल्य निर्धारित
करणे समाविष्ट आहे, जे बाजारपेठेतून न जाता थेट वापरले जाते. उत्पादक-वापर मूल्यांकनामध्ये लाकूड,
मासे, मांस, मध व औषधी वनस्पतींसारख्या व्यावसायिक उत्पादन व विक्री केलेल्या उत्पादनांचे मूल्य
जाणून घेणे समाविष्ट आहे. गैर उपभोग्य-वापर मूल्यांकनात पाणलोट उत्पादन, प्रकाशसंश्लेषण, हवामान
नियमन आणि मृदा उत्पादनांसारख्या परिस्थितिकी परिसंस्थेच्या थेट मूल्यांचेच मूल्यांकन करण्याचा समावेश
आहे; शिवाय विशिष्ट प्रजाती अस्तित्वात आहेत, हे जाणून घेण्याचा आनंदही यात समाविष्ट आहे.
धोरणकर्ते बऱ्याचदा उत्पादक-वापर मूल्यांना अधिक महत्त्व देतात, कारण ते वनीकरण व
मत्स्योत्पादनासारख्या मोठ्या उद्योगांशी संबंधित असतात आणि ते बाजारपेठेशीच बांधील असल्यामुळे
राष्ट्रीय उत्पन्नातही प्रतिबिंबित होतात.
(8) जैवविविधता म्हणजे काय ?
(b) विलुप्ततेचे संकट म्हणजे काय?
(૦) प्रजाती व अनुवांशिक विविधतेच्या हानीमुळे कोणते धोके निर्माण होतात ?
(৫) गैर उपभोग्य-वापर मूल्यांकन म्हणजे જાય ?
(€) धोरणकर्त्याँंकडून कोणत्या मूल्यांकनाची अधिक प्रशंसा होते आणि का?
पुढील उतान्याचा अंदाजे एक-तृतीयांश शब्दांत सारांश लिहा. னள शीर्षक देऊ नये. सारांश
मराठीत लिहा.
प्रसन्नता म्हणजे काय, हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर काल्पनिक जगात नव्हे, तर समृद्ध व
पूर्णत्वाचे चांगले जीवन जगणाऱ्या माणसांमध्येच ती शोधावी लागेल. जेव्हा तुम्ही एखाद्या अतिशय प्रसन्न
व्यक्तीला पाहता तेव्हा तुमच्या असे लक्षात येते की ती व्यक्ती होडी बनवीत आहे, दीर्घ संगीत-रचना तयार
करीत आहे, आपल्या पाल्यास शिकवीत आहे, आपल्या बागेत सुंदर सुंदर फुले उगवीत आहे; तेव्हा ती
व्यक्ती कधीतरीच प्राप्त होणाऱ्या दुर्लभ वस्तूच्या रूपात कधीही प्रसन्नता शोधणार नाही. ती याबाबत
अवगत असेल की दिवसातील चोवीस तास सतत कार्यमग्न असण्याच्या काळातही ती प्रसन्न आहे.
SLPM-C-MRTH 3
12
12
12
12
12
60
आपल्याच व्यक्तित्वावर संपूर्णत: केंद्रीत असणाऱ्या कोणत्याही कार्यात कोणतीच व्यक्ती समाधानी
असणार नाही; किंवा केवळ तिच्या स्वत:च्या तात्कालिक गरजांच्या पूर्ततेशी संबंधित कार्यातही नाही.
त्याचप्रकारे कोणतीही व्यक्ती केवळ स्वकेंद्री सामाजिक संबंधांत पूर्णपणे समाधानी असणार नाही; जे केवळ
स्वंत:वरच आणि स्वतःच्या सीमित व संकुचित वर्तुळाशीच संबंधित आहेत. प्रसन्नतेच्या प्राप्तीसाठी
आपणास तिला आपल्या ‘হন’ च्या बाहेरच शोधावे लागेल.
जर आपण स्वतःसाठीच जगत असाल तर आपण नेहमीच आपल्या विचारांच्या व आवडीच्याच
पुनरावृत्त होणाऱ्या मरणसदृश कंटाळवाण्या तत्काळ संकटात ढकलले जाता. अत्यधिक मानवी प्रसन्नतेच्या
दिशेने जाण्याची एक संधी निवडा आणि स्वत:ला तिच्यासोबत जोडून घ्या. जोपर्यंत एखादी व्यक्ती
आपल्या ‘অন্ত’ ला आपल्या समवेतच्या मनुष्यांप्रतीच्या सेवेत समर्पित करत नाही, तोपर्यंत तिला तिच्या
जगण्याचा अर्थ कळत नाही. जर आपल्याला என, तुमच्या महत्त्वाकांक्षेमुळे गर्व वाटत असेल, तर
मग तिच्या उपलब्धींची एक मानसिक सूची तयार करा. तुम्ही स्वत:लाच विचारा की, तुम्ही या वैयक्तिक
उपलब्धीच प्राप्त करू इच्छिता का; आणि प्रसन्न राहण्याच्या संधींचा त्याग करू इच्छिता; अथवा तुम्हाला
आनंदी राहणेच पसंत आहे आणि तुम्हाला तुमच्या “ગર द्वारा प्रस्तावित प्रतिष्ठेचा त्याग करायचा आहे.
ज्या कोणालाही अत्यधिक प्रसन्नता आणि अधिक सफलता अर्जित करायची आहे, त्यांच्यासाठी
जीवनाचे एकच तत्त्वज्ञान असू शकते, ते म्हणजे रचनात्मक परोपकाराचे तत्त्वज्ञान ! एक वास्तविक प्रसन्न
व्यक्ती नेहमीच एकप्रकारे संघर्षरत आशावादी असते. आशावादात केवळ परोपकाराचाच समावेश होत
नाही, तर सामाजिक उत्तरदायित्व, सामाजिक धैर्य व वस्तुनिष्ठतेचाही समावेश असतो. या श्रेणीत येणारे
स्त्री-पुरुष ते आहेत, जे जीवनाला दृढतेने स्विकारतात; वयस्कांप्रमाणे वास्तवाला सामोरे जातात, संकटांचा
मुकाबला धैर्याने करतात, ज्ञानाला करुणेशी जोडतात, आपल्या जगण्यातील उत्साहाला आपल्यातील
विनोदबुद्धीची जोड देतात; - एका शब्दात सांगायचे तर तेच खरे संपूर्ण मनुष्य आहेत. चांगले जीवन सक्रीय
परोपकाराच्या कार्यमग्न तत्त्वज्ञानाची अपेक्षा बाळगते. हेच तर समाधानी आयुष्य आहे आणि मनुष्य असूनही
प्रसन्न राहण्याचा एकमेव मार्ग आहे.
प्रसन्नतेचे घटक इतके साधे सरळ आहेत की त्यांना हाताच्या बोटावर मोजता येते. प्रसन्नता आतून
येते आणि साध्या चांगुलपणावर व निर्भेळ सद्सद्विवेकावर विसंबते. यासाठी धर्माची आवश्यकता नाही,
परंतु, नैतिकतेच्या सिद्धान्तांवर आधारित तत्त्वाज्ञानाशिवायच तिला प्राप्त केले आहे, असा कोणी ऐकिवात
नाही. स्वार्थ हा तिचा शत्रु आहे. इतरांच्या आनंदातच आपला आनंद आहे. ती शांत असते आणि गर्दीच्या
ठिकाणी दीर्घकाळासाठी ती क्वचितच आढळते; पण एकांतात व विचारमग्न अवस्थेत तिला मिळवता येते.
तिला विकत घेता येत नाही, खरेतर संपतीही तिच्यापुढे हतबल असते, काहीच करता येत नाही.
जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वत:च्याच बाबतीत नीटपणे समाधानी नसते, तोपर्यंत તી सुखी-समाधानी
नसते, आणि म्हणूनच शांततेच्या शोधाचे पर्व आत्मपरीक्षणातूनच सुरू व्हायला हवे. याबाबतीत करता
SLPM-C-MRTH 4
৫4.
येण्यासारखे खूप आहे, पण જાર कमी पार पडले आहे. परंतु या आत्मविश्लेषणाच्या प्रत्ययावरच प्रत्येक
व्यक्तीला अद्वितीय बनवणाऱ्या, व ज्यांच्या विकासामुळे समाधान मिळते, अशा गुणांचा शोध अवलंबून
असतो. म्हणनच ज्या कोणाला सखप्राप्तीसाठीच्या उपक्रमाची रूपरेषा आखायची असेल, तर ती अशी
असेल - सीमित साधनांमधेही समाधानी राहणे; विलासिततेऐवजी शिष्टतेचा शोध घेणे; आणि
देखाव्याऐवजी परिष्कृत होणे; योग्य तेच करणे, परिश्रमपूर्वक अभ्यास करणे, शांतपणे चिंतन करणे, सभ्यतेने
बोलणे, निर्भिडपणे कार्य करणे; सहदयतेने नक्षत्रे आणि पक्षी, बालके વ साधुना ऐकणे; अतिशय प्रसन्नपणे
सहन करणे, धाडसाने सर्व करणे, कधीही घाई न करणे आणि अध्यात्मिक, अनपेक्षित व अचेतनाला
सर्वसामान्य जीवनामध्ये वाढू देणे. हे ध्यानात घ्यायला हवे की, हे सर्व तुमच्यासाठी कोणतेही शासन करणार
नाही; तुम्हालाच ते आपल्या स्वत:साठी करायचे आहे.
(ணன 565)
पुढील उताय्याचे इंग्रजीत भाषांतर करा :
आतंकवाद हाच संपूर्ण विश्वभरातील मानवतेसाठी सर्वात मोठा धोका बनला आहे. अमेरिका,
भारत, इस्राइल इत्यादी देश आतंकवादाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी संघर्षरत आहेत. पण हा
विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. अशात अधूनमधून नेहमीच आतंकवाद्यांच्या अमानवी कृती
वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठावर ठळक मथळयात येत आहेतच. दिवसाची सुरूवातच अशा भयंकर बातम्यांनीच
होते. आपल्या स्वतःच्या स्वार्थमूलक लाभासाठी हे लोक, न जाणो, कितीतरी निरपराध्यांचा बळी घेत
आहेत.
भारतात, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच, काही लोकांनी विदेशी शक्तीच्या प्रभावात येऊन
आतंकवादाचे बीज रोवले. त्याची पाळेमुळे आता संपूर्ण देशभरात अशी फैलावली आहेत की परिस्थिती
अतिशय विदारक आहे. काश्मिरमध्ये अत्यंत भीषण रूपात आतंकवाद अस्तित्वात आहे. तेथील
मलनिवासीच आता शरणार्थीसारखे राहत आहेत. न जाणो, आज काय घडेल, अशा भयग्रस्त सावटात
तिथला प्रत्येक दिवस सरकत असतो. केवळ جو नव्हे, तर आसाम, बंगाल, नागालँड इत्यादी प्रदेशही
आतंकवाद्यांनी आतंकित केले आहेत. या सर्व राज्यांतील कायदा व सुव्यवस्था अतिशय आव्हानात्मक
बनली आहे. संपूर्ण देशातूनच ह्या समस्येचे उच्चाटन करण्यासाठी सेना ন पोलीस कठोर परिश्रम घेत आहेत.
आतंकवादाच्या उच्चाटनासाठी सरकार अनेक ठोस पावले उचलत आहे, परंतु सर्वसामान्य जनतेचे सहकार्य
सद्धा गरजेचेच आहे. जर प्रत्येकानेच, त्यांच्या व्यक्तिगत, धार्मिक स्वार्थाचा प्रांतवादाचा त्याग केला व
भारतीय म्हणूनच नांदले, तर ही समस्या कायमचीच संपू शकेल. कोणताही मनुष्य दुसऱ्या मनुष्याला ईजा
पोहोचविणार नाही, कारण आतंकवाद पाशवी आहे. सर्वांनीच एकत्रित व संघटित होऊन, विश्वातूनच या
समस्येचे उच्चाटन करण्यासाठी सहकार्य करावे आणि विश्वातच शांतता व सौहार्दाची भावना रूजवायला
हवी. फक्त त्याचवेळी देश आणि समाज प्रगतीपथावर अग्रेसर होईल.
SLPM-C-MRTH 5
20
७5.
७6.
पुढील उताय्याचे मराठीत भाषांतर करा. 20
Healthy children are an essential component of an effective education
system. Good health reduces absenteeism and dropouts and increases
scholastic performance. An effective school health programme is one of the
most cost-effective approaches in improving community health. School
health activities contribute to healthy lifestyles, thus leading to a healthy
future generation. School children also communicate the health-related
information gained in schools to their families and neighbourhood,
contributing to improved family and community health. The functions of
school health services include detection and treatment of defects, creation
and maintenance of hygienic environment in and around the school,
provision of school meals, and improvement of nutritional status of children.
This may be further enlarged to include health check-ups and immunisation
campaigns.
(೩) पुढील वाक्प्रचारांचा/म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 2x5=10
6) पाणी सोडणे 2
01) पाय मोकळे करणे 2
(7) पाळतीवर असणे 2
(४) कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ 2
യ नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा 2
(b) पुढे दिलेल्या कल्पनांचा 10 वाक्यांत विस्तार करा. 5x2=10
6) जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे 5
(7) नाही निर्मळ जीवन, काय करील साबण? 5
(০) पुढे दिलेल्या विषयावर 20 वाक्यांचा संवाद लिहा. 10
बोलीभाषांचे महत्त्व
SLPM-C-MRTH 6
(ત) पुढे दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. கடத,
6) पाणि
ઊં) गवाक्ष
(1) ತಕ್ಷ
(ए) মিম
ന پچ
بد == ید ae
(૭) पुढे दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 1x5=5
@ মান
ઊં) टणक
00) 8
(iv) चोर
യ आरोग्य
a ౨౧ [5 ৯
SLPM-C-MRTH 727

